गानतपस्विनी सुमनताई चौधरी स्मृतिसोहळा शनिवारी

मुंबई विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांचं शास्त्रीय गायन

0 112

बहुगुणी डेस्क, अमरावतीः गानतपस्विनी सुमनताई चौधरी यांचा स्मृती सोहळा शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता होत आहे. अंबादेवी ते रविनगर रोडवरील अस्मिता संगीत निकेतन येथे त्यानिमित्त शास्त्रीय गायनाची विशेष मैफल आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल कडू राहतील. यावेळी डॉ. आर. आर. धांडे आणि आणि भोलेश्वरजी मुद्गल प्रमुख पाहुणे असतील. यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित झालेले मुरलीधरजी भोंडे आणि सुरमणी प्रा. कमलताई भोंडे यांचा विशेष सत्कार होईल.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांचं शास्त्रीय गायन होईल. त्यांना संवादिनीची साथ पं. नारायणराव दरेकर आणि तबल्याची साथ प्रा. अजय महल्ले करतील. या कार्यक्रमाचं निवेदन सुनील इंदुवामन ठाकरे करतील. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती राहुल धांडे आणि डॉ. मुक्ता महल्ले धांडे यांनी केली आहे.

Comments
Loading...