लाकडी दांडयाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

चिखलगाव परिसरातील घटना

0 2,399
विवेक तोटेवार, वि.मा. ताजने, वणी:  लगतच्या चिखलगाव येथे लाकडी दांड्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. सदर घटना गुरुवारी रात्री दरम्यान घडली. श्रीकांत अरविंद ठाकरे वय ३६ रा. चिखलगाव (मेघदूत वसाहत)असे मृतकाचे नाव आहे. सदर मृत्यू प्रकरणी मृतकाचा नातेवाईक हितेश सुधाकर राऊत याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानदीप उर्फ सोनू निमसटकर वय २९, संदेश तिखट वय २२ आणि स्वप्नील धुर्वे ३२ सर्व रा. चिखलगाव (बोधेनगर) यांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध भांदवी कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतक आणि संशयित आरोपी दारूच्या नशेत होते. दरम्यान मृतक श्रीकांत आणि आरोपींमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. झटापटीत ज्ञानदीप निमसटकर यांनी श्रीकांतच्या डोक्या तोंडावर लाकडी दांडयाने मारले. यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी स्वतःला वाचविण्यासाठी घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. मृतकाची गाडी घटनास्थळापासून दूर नेऊन रस्त्यावर टाकली. तर मृतकाचा अपघात झाला असे दाखवित स्वतःच तिघांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी पोलीसांना कळविले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत सर्व आरोपींना अटक केली आहे.
Comments
Loading...