मुख्याध्यापक गणेश भोयर यांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहणार - गणेश भोयर

बहुगुणी डेस्क, वणी: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गणेश चंपतराव भोयर यांची मुख्याध्यापक पदावरून ‘विस्तार अधिकारी (शिक्षण)’ या उच्च पदावर पदोन्नती झाली आहे. मारेगाव तालुक्यातील चोपण येथील जिल्हा परिषद शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. मुख्याध्यापक असताना त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता व प्रशासकीय कौशल्य यामुळे आता त्यांची नियुक्ती वणी पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून झाली आहे. 

मारेगाव तालुक्यातील चोपण येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना भोयर यांनी आपल्या कार्यक्षम नेतृत्वाने आणि प्रशासकीय कौशल्याने शाळेच्या शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल घडवले. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत प्रशासनाने त्यांना वणी पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून पदोन्नीत केले आहे.

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहणार !
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणे हा माझा नेहमीचा ध्यास राहिला आहे. नव्या जबाबदारीमुळे मला शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल. अशी प्रतिक्रिया गणेश भोयर यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या पदोन्नतीमुळे भोयर यांचे कुटुंबीय, सहकारी शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि मित्रमंडळींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नव्या भूमिकेतही ते यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Comments are closed.