बहुगुणी डेस्क, वणी: धुमे नगर, वणी येथील रहिवासी व वेकोली कर्मचारी गणेश पुंजारामजी चौधरी (वय ५८ वर्षे) यांचे आज पहाटे सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने वणी शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. स्व. गणेश चौधरी हे केवळ एक मेहनती कर्मचारी नव्हते, तर वणी शहरातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे, सर्वांशी सौजन्याने वागणारे स्मितभाषी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या हसतमुख स्वभावाने आणि सद्भावनेने अनेकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने वणीने एक कार्यतत्पर आणि हृदयस्पर्शी व्यक्ती गमावली आहे. आज दु. 3 वाजता धुमे नगर, वणी येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहेत. गणेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.