बाप्पाचे धडाक्यात आगमन, तालुक्यात 112 सार्वजनिक मंडळ

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे धडाक्यात आगमन झाले आहे. वणी तालुक्यात 112 सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. वणी पोलीस स्टेशन व शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची संख्या मागील वर्षी पेक्षा यावर्षी थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात झाली koआहे. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात यावेळी 35 सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार आहे. तर वणी पोलीस स्टेशन अंतर्गत वणी ग्रामीण मध्ये 24 सार्वजनिक गणेश मंडळाने नोंदणी पूर्ण केली आहे. तसेच एक गाव एक गणपती ही संकल्पना 12 गावात राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत 41 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. शहरात यावर्षी 1 मंडळाने वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात 4 गणेश मंडळाने वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेक मंडळाने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणे बंद केले होते. परंतु पुन्हा त्याच उत्साहाने यावर्षी अनेक गणेश मंडळ पुढे आले आहेत. यावर्षी वणी व शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत 112 गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे.

Comments are closed.