काळजी नको… महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर

जितेंद्र कोठारी, वणी : गणेशोत्सव सोबत ईद ए मिलाद उत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावा. यासाठी पोलीस विभाग सज्ज असून याचाच भाग म्हणून मंगळवार 19 सप्टेंबर रोजी वणी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांना सुरक्षेचा संदेश दिला. शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. रूटमार्चमध्ये वणी पो.स्टे. आणि वाहतूक उप शाखेच 8 पोलीस अधिकारी 25 पोलीस अमलदार, आर.पी.सी.चे 7 अमलदार आणि 32 होमगार्ड सहभागी झाले होते. 

वणी पोलीस स्टेशन येथून शहरातील छत्रपती शिवाजी चौक, खाती चौक, भगतसिंग चौक, हमीद चौक, मोमीनपुरा, भारतमाता चौक, दीपक टॉकीज ते नेताजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक ते परत पोलीस स्टेशन या मार्गावर पोलिसांनी लाठी, रायफल, हेल्मेट, गॅस गन व ढालसह पथ संचलन केले. रूटमार्च मध्ये सर्वात पुढे उप विभागीय पोलीस अधिकारी, गणेश किंद्रे, ठाणेदार पो. नि. अजित जाधव होते. तर दुसऱ्या रांगेत सपोनी माधव शिंदे, सपोनी दत्ता पेंडकर, सपोनी राजेश पुरी, सपोनी माया चाटसे, सपोनी सीता वाघमारे, पोउपनि अरुण नाकतोडे, पोउपनि सुदाम आसोरे होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी शिस्तबद्ध रांगेत सहभागी झाले होते.

Comments are closed.