पीक नुकसानग्रस्त ३३ शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?
सुशील ओझा, झरी: गणेशपूर येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन करूनही पीक नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सात दिवसात नुकसान भरपाई केली गेली नाही तर तीव्र आंदलन करण्यात येईल असा इशारा 33 शेतकऱ्यांनी दिला आहे. रस्त्याच्या कामामुळे या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याबाबतचा नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वणी-मुकुटबन-बोरी राज्यमार्ग ३१५ रस्त्याच्या सुधारण्याचे काम शारदा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे २७ नोव्हेंबर २०१५ ला सुरु करण्यात आले. या मार्गाची पूर्ण करण्याची मुदत २४ महिने होती. २४ महिने लोटूनही राज्यमार्गाचे झाले नसल्याने हिवरदरा ते खडकी पर्यंत ३ किमी रोडवर पूर्ण गिट्टी बाहेर पडून लहान मोठे अपघातात वाढ झाली होती व रोड वरील उडणाऱ्या धुळीमूळे शेतकर्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत मुकुटबनपासुन ४ किमी अंतरावर असलेल्या गणेशपुर येथे २२ जानेवारीला मुकूटबन-वणी मार्गावर पीक नुकसानग्रस्त शेतकरी व गणेशपूर ग्रामवासीयांनी आशिष कुळसंगे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले होते. २९ जानेवारी पर्यंत रास्ता दुरुस्त होऊन शेतकऱ्यांना पिकांची नुकसान न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन, करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार यांनी पीडित ३३ शेतकरी सह तलाठी, कृषी विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, ठाणेदार, रोड ठेकेदार यांच्यसमक्ष बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई ठेकेदाराकडून वसूल करून देण्यात येईल असा निर्णय होऊन तसे प्रोसीडींग वर घेण्यात आले होते. तसा नुकसानीचा अहवाल वरिष्ट कडे पाठवण्यात आला. परंतु दीड महिना लोटूनही अजूनही शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.
शेती नुकसान बाबत अधिकारी यांना विचारणा केली असता पीक नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे असे सांगून हात झटकत आहे. व ठेकेदाराला शेतकऱ्यांना नुकसान देण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे, असा आरोप शेतकरी करीत आहे.
नुकसान भरपाई मिळण्याची करिता पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांना १ जानेवारीला निवेदन दिले आहे. यात मार्च महिन्यात रोडच्या ठेकेदारांचे बिल काढू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेशपूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई सात दिवसाच्या न दिल्यास ३३ शेतकरर्याना घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा सेनेचे उप जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांनी दिला आहे.
नुकसान ग्रस्त शेतकरी उमाकांत बदकल, रवींद्र कारेकर, रामदास बरडे, अनिल आसुटकर, प्रभाकर आसुटकर, साधू कुळसंगे, संदेश बरडे, अनंता कुळसंगे, नारायण पिदुरकार, दिलीप कारेकार, राजू आसुटकर, पंकज तातेड, सतीश बेलेकार, सुधाकर बेलेकार, रामदास बेलेकार, अनिल लिंगारेडडी, विनायक आसुटकर, गोपिका आसुटकर, भाऊराव चिने, मारोती बेलेकार, विवेक आसुटकर, अलका लोनगाडगे, देवेंद्र लोनगाडगे, सुरेश लोनगाडगे, रवींद्र लोनगाडगे, प्रकाश कोठारी, वसंत बदकल, अलका कुळसंगे, आशिष कुळसंगे, अंकुश कुळसंगे, आकाश कुळसंगे, सतीश बेलेकार, माया आवारी, व प्रभाकर लोनागाडगे असून पीक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.