सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील सिलिंडर गॅस लिक झाल्याने घराला आग लागली. रविवारी दुपारी गणेशपूर येथील राजू आसुटकार हे आपल्या कुटुंबासह आपल्या घरी असताना चहा बनविण्याकरिता त्यांची पत्नी गेली व शेगडी पेटविला असता शेगडीसह सिलिंडरला आग लागली व भडका उडाला.
सिलिंडरमधून गॅस लिक होत असल्याने सदर आग लागली. आग लागताच घरातून धूर निघायला सुरवात झाली. ज्यामुळे घाबरलेल्या आसुटकर कुटुंबात आरडाओरड सुरू झाली. पाहता पाहता पूर्ण गाव जमा झाला. गावकऱ्यांकडून सिलिंडरला लागलेली आग विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही. परंतु राजू आसुटकर यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार धर्मराज सोनुने हे कर्मचारी प्रवीण ताडकोकुलवार,पुरुषोत्तम घोडाम, मोहन कुडमेथे, नीरज पातूरकर व राम गडदे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. लिक सिलिंडरमधून गॅस निघत असल्याने घरावरील कौलं पोलीस व ग्रामवासीयांनी काढले. ज्यामुळे घरातील गॅस घराच्या बाहेर निघाला. लिक सिलिंडरमधील गॅस बंद होत नसल्याने दुसऱ्या सिलेंडरचा वरील बुच लावला. आला व सिलेंडर घराचा बाहेर काढण्यात आला.