गुढीपाडव्यानिमित्त गावरान तडका रेस्टॉरन्टमध्ये खास व्हेज डिशचा बेत

पाडवा स्पेशल व्हेज डिशेस व स्विट डीशची राहणार चंगळ.... गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्टमध्ये साजरा करा गुढीपाडवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट येथे आज शनिवारी दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त पाडवा स्पेशल व्हेज डिशेसचा बेत राहणार आहे. यात खवय्यांना मेन कोर्समध्ये काजू कुंभ मसाला, व्हेज सुंदरी स्पेशल, पनिर पसंदा, व्हेज कस्तुरी, पनिल दिलबहार (सिग्नेचर डिश) या स्पेशल डिशेससह इतरही मशरूम, पनिर, चिजच्या व्हेज डिशेस उपलब्ध राहणार आहे. तर स्नॅक्समध्ये विविध प्रकारचे व्हेज कबाब, पनिर टिक्का. पनिर हरियाली कबाब, पहाडी कबाब, मलई कबाब, पनिर मलई टिक्का, मशरूम टिक्का, पायनॅपल टिक्का इत्यादी स्टार्टर उपलब्ध आहेत. पनिर दिलबहार ही गावरान तडका रेस्टॉरन्टची सर्वात लोकप्रिय डिश असून केवळ या डिशचा आनंद घेण्यासाठी घुग्गुस, पांढरकवडा, वरोरा, मारेगाव, मुकुटबन, कुचना, कोरपना, चंद्रपूर इत्यादी ठिकाणाहून खवय्ये गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये येतात. आजची गुढीपाडव्याची संध्याकाळ गावरान तडका सोबत घालवून अविस्मरणीय करा असे आवाहन रेस्टॉरन्टच्या संचालकातर्फे करण्यात आले आहे.

गावरान तडका हे अलीकडेच सुरू झालेले वणीतील एक फॅमिली रेस्टॉरन्ट आहे. इथे शुद्ध फल्ली तेल, तूप व अमुल बटरचा वापर करून जेवण तयार केले जाते. तसेच रेस्टॉरन्टमधल्या अधिकाधिक डिश या चुलीवर बनवलेल्या असल्याने खवय्यांना अस्सल झणझणीत व गावरान चव असलेला स्वाद मिळतो. शिवाय तंदूर सुरू असल्याने नान, कुलछा, लच्छा पराठा, तंदूर पराठा इत्यादी रोटीच्या डिश देखील ग्राहकांना चाखता येणार आहे. 

पनिर दिलबहार… एकदा चाखून तर बघा….
उत्कृष्ट सर्विस, गार्डन, मनमोहक ऍम्बियन्स यामुळे अल्पावधीतच गावरान तडकाने वणीच्या खवय्यांमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. इथे फॅमिलीसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे फॅमिलीसह ग्राहकांना जेवणाचा आनंद लुटता येतो. शिवाय कॉल करून टेबल बुक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे इथली सिग्नेचर डिश असलेली पनिर दिलबहार ही डिश जर आपण चाखली नसेल तर एकदा नक्की येऊन याचा नक्की आनंद घ्या असे आवाहन रेस्टॉरन्टच्या संचालकातर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट
गंगशेट्टीवार लॉन, वरोरा रोड, एकता नगर वणी
अधिक माहिती साठी संपर्क: 9529986216, 9658102030, 9623102030

Comments are closed.