रविवार स्पेशल: होटेल गावरान तडकामध्ये आजपासून केजीएफ थाली सुरू

थाळीत 5 ते 6 मेनकोर्सचा समावेश... आज तंदुरीच्या प्री बुकिंगवर 200 रुपयांची सूट

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका येथे ग्राहकांना दर वेळी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. आजपासून ग्राहकांसाठी केजीएफ ही जंबो थाली सुरू करण्यात येत आहे. चिकन, मटन व अंडा या तीन प्रकारात ही डिश येते. यात करी, भुना, रोस्ट, बिर्याणी, तंदुरी अशा चार ते पाच मेन कोर्सचा समावेश आहे. सोबतच थाळीत जिरा राईस, भाकर, चपाती, तंदुरी रोटी, पापड, मठ्ठा इत्यादी देखील दिले जाते. या थाळीत 4 लोक आरामात जेवण करू शकतात. 

खास रविवार स्पेशल म्हणून तंदुरी चिकनवर प्री बुकिंगवर 200 रुपयांची सूट देण्यात आली. तर ऑनस्पॉट ऑर्डरवर 100 रुपयांची सूट  देण्यात आली आहे. यासह रविवार स्पेशल लांब पोळ्या (लंब्या रोट्या) मटण, चिकनचा बेत नेहमीसारखा राहणार आहे. या रेस्टॉरन्टमध्ये तंदूर उपलब्ध असल्याने तंदुरी चिकन, चिकन टिक्का, विविध प्रकारचे कबाब, तर व्हेज मध्ये पनिर टिक्का. पनिर हरियाली कबाब, पहाडी कबाब, मलई कबाब, पनिर मलई टिक्का, मशरूम टिक्का, पायनॅपल टिक्का इत्यादी डिश उपलब्ध आहेत. व्हेज प्रेमींसाठी पनिर दिलपसंद ही गावरान तडका स्पेशल डिश उपलब्ध आहेत. ही डिश खाण्यासाठी दूरदूर खवय्ये गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये येतात. 

गावरान तडका येथे चुलीवर बनवलेले अस्सल झणझणीत व गावरान चव असलेले जेवण मिळते. उत्कृष्ट सर्विस, गार्डन, मनमोहक ऍम्बियन्स यामुळे अल्पावधीतच गावरान तडकाने वणीच्या खवय्यांमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. इथे फॅमिलीसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे फॅमिलीसह ग्राहकांना जेवणाचा आनंद लुटता येतो. शिवाय कॉल करून टेबल बुक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. विविध शाकाहारी व मांसाहारी डिशेससह इथे बनवाईही केली जाते. ग्राहकांनी आणून दिलेले मटन, चिकन येथे खास चुलीवर व फल्ली तेलात बनवून दिले जाते. तसेच मटन, चिकन इत्यादींची किलो प्रमाणेही ऑर्डर देऊन बनवून घेता येते.

पनिर दिलबहार… एकदा चाखून तर बघा….
गावरान तडकामध्ये शाकाहारी प्रेमीसाठीही विविध प्रकारच्या डिश उपलब्ध आहेत. यात स्टार्टर व मेन कोर्स आहेत. मात्र इथली सर्वात प्रसिद्ध व सिग्नेचर डिश ही पनिर दिलबहार आहे. या डिशचा आनंद घेण्यासाठी घुग्गुस, पांढरकवडा, वरोरा, मारेगाव, मुकुटबन, कुचना, कोरपना, चंद्रपूर इत्यादी ठिकाणाहून खवय्ये गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये येतात. फोनवरून ऑर्डर देऊन ही डिश घरपोच मागवण्याची सेवा देखील ग्राहकांना उपलब्ध आहे. त्यामुळे ही डिश जर आपण चाखली नसेल तर एकदा नक्की चाखून बघा असे आवाहन संचालकांनी केले आहे. 

गावरान तडका हे अलीकडेच सुरू झालेले वणीतील एक फॅमिली रेस्टॉरन्ट आहे. इथे शुद्ध फल्ली तेल, तूप व अमुल बटरचा वापर करून जेवण तयार केले जाते. तसेच रेस्टॉरन्टमधल्या अधिकाधिक डिश या चुलीवर बनवलेल्या असल्याने खवय्यांना अस्सल झणझणीत व गावरान चव असलेला स्वाद मिळतो. शिवाय तंदूर सुरू असल्याने नान, कुलछा, लच्छा पराठा, तंदूर पराठा इत्यादी रोटीच्या डिश देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आजची संध्याकाळ गावरान तडका सोबत घालवून अविस्मरणीय करा असे आवाहन गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट तर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट
गंगशेट्टीवार लॉन, वरोरा रोड, एकता नगर वणी
अधिक माहिती साठी संपर्क: 9529986216, 9658102030, 9623102030

Comments are closed.