रविवार स्पेशल: आज गावरान तडका मध्ये लांब पोळ्या मटण-चिकनचा बेत

गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्टमध्ये तंदूर च्या विविध व्हेज नॉन व्हेज डिश उपलब्ध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका येथे आज रविवार स्पेशल लांब पोळ्या (लंब्या रोट्या) मटण, चिकनचा बेत आखण्यात आला आहे. याशिवाय या रेस्टॉरन्टमध्ये तंदूर देखील सुरू झाल्याने तंदुरी चिकन, चिकन टिक्का, विविध प्रकारचे कबाब, तर व्हेज मध्ये पनिर टिक्का. पनिर हरियाली कबाब, पहाडी कबाब, मलई कबाब, पनिर मलई टिक्का, मशरूम टिक्का, पायनॅपल टिक्का इत्यादी डिश उपलब्ध आहेत. व्हेज प्रेमींसाठी पनिर दिलपसंद ही गावरान तडका स्पेशल डिश उपलब्ध आहेत. ही डिश खाण्यासाठी दूरदूर खवय्ये गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये येतात. त्यामुळे आजची संध्याकाळ गावरान तडका सोबत घालवून अविस्मरणीय करा असे आवाहन गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट तर्फे करण्यात आले आहे.

ऑर्डर देऊन बुक करा चुलीवरची चिकन मटन हंडी 
चिकन मसाला, मटन मसाला, मटन सुक्का, चिकन सुक्का इद्यादी मेन कोर्स डिश ग्राहकांना ऑर्डर देऊन बुक करता येणार आहे. किलो व हंडीनुसार या डिश ग्राहकांना दिली जाईल. केवळ मोजक्या आणि आधी येणा-याच ऑर्डरच स्वीकारल्या जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन गावरान तडका तर्फे करण्यात आले आहे.

गावरान तडका हे अलीकडेच सुरू झालेले वणीतील एक फॅमिली रेस्टॉरन्ट आहे. येथे चुलीवर बनवलेले अस्सल झणझणीत व गावरान चव असलेले जेवण मिळत असल्याने अल्पावधीतच गावरान तडकाने वणीच्या खवय्यांमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. इथे फॅमिलीसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली गेली आहे. विविध शाकाहारी व मांसाहारी डिशेससह इथे बनवाईही केली जाते. ग्राहकांनी आणून दिलेले मटन, चिकन येथे खास चुलीवर व फल्ली तेलात बनवून दिेले जाते.

पत्ता: गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट
गंगशेट्टीवार लॉन, वरोरा रोड, एकता नगर वणी
अधिक माहिती साठी संपर्क: 9529986216, 9658102030, 9623102030

Comments are closed.