सुशील ओझा, झरी: शनिवारी भारतीय जनता पार्टी झरी तालुक्याचे घंटानाद आंदोलन झाले. लिंगती येथील श्रीराम मंदिर येथे याचे आयोजन झाले. महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची प्रार्थना व धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी झरी तालुकाच्या वतीने हे घंटानाद आंदोलन झाले.
कोरोना अनलाॅकमधे इतर सर्व आवश्यक सेवा पूर्ववत करण्यात आल्यात. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा व श्रद्धेचा सन्मान करून मठ, मंदिर, मशीद, बुद्धविहार, गुरुद्वारा,जैनस्थानक, चर्च, दर्गा आदी प्रार्थनास्थळे तत्काळ उघडी करावीत. या जनभावनेच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर भाजपाचे घंटनाद आंदोलन झाले.
भाजपा झरी तालुका अध्यक्ष सतीश नाकले, राजरेड्डी याल्लावार, अशोकरेड्डी बोदकुरवार, राजेश्वर गोंड्रावार, ब्रम्हानंदरेड्डी येल्टीवार, अनिल पावडे, भुमारेड्डी पाटकुरवार, अनिल विधाते, सतीश दासरवार, प्रवीण नोमुलवार, अंकुश लेंढे, रमेश येनगुवार तसेच झरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते ह्या घंटानाद आंदोलनाला उपस्थित होते.