झरीमध्ये मनोहर भिडेंच्या अटकेसाठी घंटानाद आंदोलन

0

राजू कांबळे, झरी: झरीमध्ये मंगळवारी सकाळी 10 .30 वाजता भारिप बहुजन महासंघाद्वारे घंटानाद आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव दंगलीचे प्रमुख सूत्रधार असणाऱ्या मनोहर कुळकर्णी उर्फ भीडे गुरुजी यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक करावी. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

गेल्या तीन वर्षांपासून ओ बी सी, एससी, एस टी, विजेएनटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यांना थकीत शिष्यवृत्ती दयावी. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या ही कर्जबाजारी पणामुळे झाली आहे. सरकारने असा दावा केला होता की, आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु याबाबत कोणत्याहो ठोस पाऊल अजूनही उचलले गेले नाही. सरकारला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी म्हणून एक आगळेवेगळे व सर्व जनतेचे व सरकारचे लक्ष वेधनारे असे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भारत कुमरे जिल्हा सहसचिव भारिप बहुजन महासंघ यवतमाळ, ऍड. यशवंत बरडे, सूर्यकांत पोटे, राम कांबळे, हेमंत काटकर, विकास नगराळे, प्रतीक बहादे, ऍड दिपक काटकर, शैलेष नरांजे, ऍड. विप्लव तेलतुंबड़े, प्रफुल भोयर, सिद्धार्थ भोयर व झरी तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.