मारेगाव: शुक्रवारी घोडदरा इथल्या पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता तयार होत आहे. हा रस्ता केवळ 24 तासांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
घोडदरा हे मारेगाव तालुक्यातील एक आडवळणावरचे गाव आहे. जवळपास 100 घरांची ही वस्ती आहे. आडवळणावरचे हे गाव असल्याने इथे विकासाची गंगा काही पोहोचलीच नाही. गावातून शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावक-यांचे प्रचंड हाल व्हायचे. पावसाळ्यात हा त्रास आणखी वाढायचा. रस्त्यावर चिखल होत असल्याने बैलगाडी नेणं जिकरीचं काम होतं. अखेर डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून आणि लोकसहभागातून इथे पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. लवकरच हा रस्ता पूर्ण केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश माफुर, सूर्यकांत खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास नेहारे, बंडू मोरे, दयालाल रोगे, बापुजी चांदेकर, नथ्थुजी पुरके, आनंद जिवतोडे, लक्ष्मण रोगे इत्यादी परिश्रम घेत आहेत.