मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढण्यात याव्यात
युवक काँगेस व शेतकऱ्यांचे केंद्रियमंत्री यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: कापूस हंगाम सन २०२०-२१ मधील कापूस खरेदीकरिता तालुक्यातील मुकुटबन येथील जिनिग व प्रेसिंगच्या निविदा काढाण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी तथा युवक कॉंग्रेसने तसे निवेदन केंद्रियमंत्र्यांना दिले.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व कृषिउत्पन्न बाजार समिती आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी समिती आहे. झरी तालुका आदीवासीबहुल तालुका असून तालुक्यातील कापूस हा जिल्ह्यात सर्वात उच्च दर्जाचा कापूस आहे.
बाजार समितीने मॅजिक वर्षी ९२ हजार १८ क्विंटल कापूस खरेदी केली. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचे कापूस ३० मेपर्यंत पूर्ण खरेदी केला.
बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी नसताना तसेच बाजार समितीचे एवढे चांगले नियोजन करून कापूस खरेदी केली. तरीपण सीसीआयच्या खरेदीपासून मुकुटबन केंद्राला वगळण्यात आले. सीसीआय कापूसखरेदी करण्यापासून वगळण्याचे कारण काय ? असा संतप्त प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
सीसीआय खरेदी करीत असताना मुकुटबन येथे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसतानासुद्धा नुकूटबन केंद्राला सीसीआय खरेदीपासून वगळण्यात आले आहे. सीसीआय कापूस खरेदीबाबत अकोला विभागाचे प्रमुख यांना बाजार समितीने विचारणा केली असता स्टाफ कमी असल्याचे मुकुटबन केंद्र वगळण्यात आल्याचे सांगितले.
तसेच कापूस खरेदी केंद्राबाबत बाजार समिती वेळोवेळी पत्रव्यवहार करीत आहे; परंतु कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मुकुटबन केंद्राची निविदा त्वरित न काढल्यास आंदोलन छेडण्यात येईल. तरीसुद्धा मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार गिरीश जोशी यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री समूर्ती इराणी यांना
बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, माजी संचालक तथा सरपंच नीलेश येल्टीवार, कृ. उ. बा. समिती संचालक बळी पेंदोर, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांडेकर, रमेश संसनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
तक्रारकर्ते यांनी खासदार बालू धानोकर व माजी आमदार वामनराव कासावार यांनासुद्धा तक्रार दिली आहे. खासदार धानोरकर व माजी आमदार कासावार यांनी सदर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)