पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 वणी येथे गोकुळ अष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगरपरिषद वणीचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस हे होते तर उपमुख्याधिकारी खुशाल भोंगळे, जयश्री वायकोस, नगररचना अभियंता राहुल चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रतिभा मानकर, सचिन गुरनुले व शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेशभूषा स्पर्धेत शाळेतील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राथमिक गटातून चैतन्य पानघटे, आरुषी पुरी ,राजवीर गोलाईत यांनी क्रमांक पटकाविला तर उच्च प्राथमिक गटातून संकेत झाडे, नताशा किनाके व मोनिका चौधरी यांनी क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्योती धुर्वे व सिंधू गोवारदिपे यांनी काम पाहिले.
अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व आयोजक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले. नगरपरिषद शाळांमध्ये गरिबांची मुलं शिक्षण घेत असतात आणि त्या मुलांना अशा स्पर्धेतून आपण योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. सोबतच नगरपरिषद शाळांना भौतिक सुविधेची यापुढे कमतरता होणार नाही याची आपण दक्षता घेऊ याची ग्वाही ही त्यांनी दिली.
याप्रसंगी अभिजीत वायकोस यांचा सपत्नीक शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक वर्ग तथा विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयप्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवेंद्र खरवडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता जकाते, किरण जगताप, अविनाश तुंबडे व निशा कावडे यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा:
महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना
Comments are closed.