अवैध दारू विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’

सर्वसामान्यांवर कारवाई तर दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष

0 767

तालुका प्रतिनिधी, वणी: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली. दरम्यान देशातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर धंदे बंद केले. मात्र अशाही गंभीर परिस्थितीत अवैध दारूविक्रीची दुकाने सुरू आहे. त्यामुळे संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्यांना दंडे अन् अवैध दारू विक्रेत्यांना गुड डे म्हणजेच ‘अच्छे दिन’ असल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाची लागण अधिकाधिक प्रमाणात लोकांना होऊ नये. त्याकरिता प्रथम जमावबंदी आणि नंतर संचारबंदी जाहीर केली. या संचारबंदीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणे टळू शकतो. हे खरे असले तरी मात्र दवाखाना, बँक, गाडीचे इंधन, किराणा, भाजीपाला, दुध, पाणी आदी महत्वाच्या कामानिमित्त स्त्रीपुरूष, तरुण मंडळी संधी मिळताच आडमार्गाने ये जा करण्याचे प्रयत्न करतात. मात्र फिरताना पोलिसांना दिसताच त्यांच्यावर कारवाई करीत आहे.

संचारबंदी काळात कामानिमित्त रस्त्यावर फिरणारे पोलिसांना दिसतात. मात्र शहरी आणि ग्रामीण भागात अवैध दारुविक्री करणारे दिसत नाही का ? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. संचारबंदी काळात सुरू असणाऱ्या अवैध दारूविक्रीला कुणाचे पाठबळ आहेत ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एकूणच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सामान्य माणूस प्रश्न उपस्थित करीत आहे. वरिष्ठांनी सदर बाबीची गांभीर्याने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

दामले नगर, शेवाळकर परिसरला लगत अवैध दारू विक्री
वणीच्या दामले नगर, शेवाळकर परिसराच्या नैऋत्य दिशेला खुले आम अवैध दारू विक्री सुरू आहे. अल्पवयीन मुले सुध्दा थैलीत बाटल्या घेऊन विक्री करिता फिरत आहेत. सदर परिसरात फेरफटका मारल्यास अनुभव येतो. सध्या दामले फैल हे पोलिसांच्या अलर्टवर आले असल्याने शेवाळकर परिसराच्या नैऋत्य दिशेला असलेल्या मोकळ्या जागेचा अवैध दारू विक्रेते दारू विक्रीसाठी उपयोग करीत आहेत. त्यामुळे याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments
Loading...