पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी तालुक्यातुन पायदळ व चारचाकी वाहनाद्वारे होणारी जानवर तस्करी थांबवण्याचे आदेश दिले आहे. ठाणेदार यांनी आपल्या ‘झिरो’ पोलिसाच्या माध्यमातून जेवढे गोवंश तस्कर आहे त्यांना ८ दिवसांकरीता तस्करी बंद ठेवा असे मोबाइलवरून व स्वतः भेटून सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वणी बहुगुणीने तालुक्यातुन होणा-या गोवंश तस्करी बाबत वणी, पांढ़रकवड़ा, मारेगाव, वरोरा, घोंसा, कायर या बैल बाजारातून शेतक-यांचे गाय व बैल कवडीमोल भावात विकत घेऊन तेलंगानात दिग्रस, अनंतपुर मार्गाने घेऊन जातात. या जनावर तस्करीला सर्वाधिक मदत पाटण ठाण्याची असून याला वरिष्ठ अधिकारी यांचे सुद्धा पाठबल असल्याचे दिसून येते. सध्या वातावरण ‘गरम’ असल्याने ८ दिवसांकरीता गोवंश तस्करी बंद करण्याचे आदेश देणारे अधिकारी कोण ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

झरी तालुक्यातून बोरी (पाटण), उमरी, वणी, पांढरकवड़ा, मारेगाव, कळंब, राळेगाव, येथील तस्करांचं ठाण्याशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असून यामुळे निष्पाप जनावरांचे जीव जात आहे. पाटण ठाण्यातील झिरो पोलिस हा सम्पूर्ण जनावर तस्करांकडून वसुली करुन ठाण्यात पोहचवितो. ८ दिवसांकरीता जनावर तस्करी बंदची माहिती झिरो पोलीसाला कशी ? झिरो पोलिसांच्या मोबाइलचा सीडीआर काढल्यास याचीही सत्यता बाहेर निघेल.

क्रूर तस्कर व यांना मदत करणाऱ्या पोलिसांविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संघटना, किंवा राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधि अजूनही लढ़ा देण्याकरिता जागृत झाले नाही. ज्यामुळे जनावर तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. वणी बहुगुणीच्या दणक्याने पोलिस प्रशासन जागी झाली व ८ दिवसांकरीता जनावर तस्करी बंद करण्याचे आदेश देऊन जनतेच्या नजरेत चांगले काम करत असल्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. ८ दिवसानंतर पुन्हा ही जनावर तस्करी सुरु होण्याचे संकेत असून या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देऊन सदर जनावर तस्करीवर पायबंद लावावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.