विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस वणी तालुक्यात गोवंश तस्करीचे प्रमाण वाढतच आहे. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास शहरातील खडबडा येथून तेलंगणात जाणाऱ्या 27 जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
वणी पोलिसांनी आतापर्यत तालुक्यत गोमांस व गोवंश तस्करांवर 11 कारवाया करण्यात आल्या आहेत. परंतु जनावर तस्करीचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही. 19 ऑगस्ट रोजी रात्रभर चाललेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातील खडबडा येथे कत्तलीसाठी गोवंश जनावरे बांधून असल्याच माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली.
सदर माहितीच्या आधारे, खरबडा परिसरात सापळा रचून आरोपी राजू मधुकर झिलपे (वय 25 वर्ष) रा. खरबडा वणी, इलियास मुमताज अली खान वय( 39 वर्षे ) रा. गोकुळ नगर वणी, शाहरुख खान लैलाब खान (वय 28 वर्षे) रा. खरबडा वणी, यांच्या जवळून 27 गोवंश जनावरे किंमत 2 लाख 72 हजार ही जनावरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. व कत्तलीसाठी कोंबून ठेवलेली , 27 नग जनावरे ताब्यात घेऊन जनावरांना गुरुमाऊली गोरक्षण रासा येथे दाखल करण्यात आली आहे.
सदर कारवाई डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उपविभागीय पोलिस अधिकारी वणी ,यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव सुधीर पांडे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम ,दीपक वाड्रसवार, मिथुन राऊत, रत्नपाल मोहडे, संजय शेंद्रे यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास डोमा भादिकर करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.