गोवर व रुबेला लसीकरण संदर्भातील आढावा बैठक

0

बहुगुणी डेस्क, वणी: येथील बी आर जी एफ कार्यालयात गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भात आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी विकास कांबळे होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डवरे, वैद्यकीय अधिकारी पी एम बोडखे प्रा आरोग्य केंद्र शिरपूर, तालुका नोडल अधिकारी निशा वाटेकर, सहायक नोडल अधिकारी डी एन लक्षशेट्टीवार, केंद्रप्रमुख राजेंद्र कोरडे उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये वणी तालुक्यातील 252 शाळातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाविषयी माहिती घेताना वणी तालुका अधिकाऱ्यांनी 31 हजार 230 विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. यातील 27हजार 309 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असून एकूण 87.44% टक्के झाले आहे.

या सभेत विकास कांबळे यांनी ही लसीकरण मोहीम 100 टक्के पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी वणी तालुक्यातील राजूर ,कायर, शिरपूर, कोलगाव व वणी ग्रामीण रुग्णालयात गोवर रुबेला लसीकरण मोहीम सुरू ठेवली असल्याने वणी तालुक्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असेआवाहन डॉ विकास कांबळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.