अखेर गोवारीच्या शेतक-याला शासनाची मदत

वीज पडल्याने झाला होता बैलांचा मृत्यू

0
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील गोवारी (पार्डी) येथील शेतात वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना दि. २२ शनिवारी चार वाजताच्या दरम्यान घडली होती. यात सुदैवाने शेतकरी सूर्यभान किसन बदखल यांच्यासह अन्य मजूर थोडक्यात बचावले होते. यात बदखल यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. अखेर त्यांना संजय देरकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासकीय मदत मिळाली आहे. मंगळवारी दिनांक 9 जुलै रोजी त्यांना मदतीचा चेक मिळाला. संजय देरकर यांच्या हस्ते चेक सूर्यभान यांना देण्यात आला.
Podar School 2025
सूर्यभान बदखल हे गोवारी (पार्डी) येथील रहिवाशी आहे. यांच्याकडे आठ एकर शेती आहे. ऐन खरिप हंगामात बैलजोडीचा मृत्यू झाल्याने हवालदिल झाले आहे. घटनेचा पंचनामा करून महसूल विभागाने त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याची त्यांनी मागणी केली होती. याबाबत त्यांनी संजय देरकर यांच्याशी संपर्क साथला. संजय देरकर यांनी तलाठी, तहसिलदार यांच्याशी चर्चा करून मदतीसाठी पाठपुरावा केला. अखेर सूर्यभान यांना शासनाची मदत मंजूर झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी दुपारी संजय देरकर यांच्या घरी सूर्यभान यांना 50 हजारांचा चेक वितरीत करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूर्यभान यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत मिळवून दिल्याबद्दल संजय देरकर यांचे आभार मानले.
Leave A Reply

Your email address will not be published.