रुग्णालयातील औषधीमध्ये  आढळल्या मुंग्या

 आरोग्य यंत्रणेत उडाली खळबळ

0 382

जोतीबा पोटे, मारेगाव : येथील ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे एक चार वर्षीय गुंजन कृष्णा तुरणकार उपचारासाठी दाखल होती. दरम्यान  तिला  तिथे सिट्रीज -पी सायरप या औषधी दिली. त्या औषधीला सडका वास यायला लागला. त्यात मुंग्याही आढळल्याचे उघडकीस आल्याने सरकारी दवाखान्यात मिळणारी सील पॅक औषधी खराब निघाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊन नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंजन हिला ताप आल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 8 जुलै रोजी 4 वाजता दरम्यान उपचारासाठी नेले.  तिला सिट्रीज- पी सायरप औषध ची बॉटल देण्यात आली. दरम्यान गुंजन च्या वडिलांनी रात्री सात वाजता औषध पाजण्यासाठी सील पॅक बाटली उघडली. त्याच झाकणामधे औषधी टाकली. तेव्हा त्या औषधीचा सडका वास यायला लागला.  त्यात मेलेल्या मुंग्याही आढळल्या.

दरम्यान तुरणकार यांनी शेजारच्या नागरीकांना सोबत घेऊन रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. वैद्यकीय अधिकारी ड़ॉ.इंगळे यांनी तात्काळ या औषधींचे वाटप बंद करायला लावून सदर औषधी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली.

सिट्रीज -पी सायरप ही औषधी सात वर्षापर्यंत बालकास सर्दी खोकल्याच्या एलर्जी वर देण्यात येते. मात्र सरकारी दवाखान्यातील औषध खराब निघाल्याने त्या सील पॅक औषधाचा सडका वास येऊन त्यात मेलेल्या मुंग्या आल्या कश्या, हा निष्काळजीपणा का झाला असा प्रश्न उपस्थित  झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Loading...