वांजरी येथे ग्रामपंचायत महिला सदस्यावर फावड्याने हल्ला, महिला गंभीर जखमी

गावातला राजकीय वाद चक्क हाणामारी पर्यंत पोहोचला, चंद्रपूर येथे उपचार सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: गावातील राजकारण मोठे खराब असे म्हटले जाते. रस्त्याच्या कामावरून झालेला एक राजकीय वाद चक्क हाणामारीपर्यंत पोहोचला. गावातील एकाने महिला ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यावर फावड्याने हल्ला केला. तर त्याच्या पत्नीने केस पकडून सदस्याचे डोके जमिनीवर आपटले. यात ग्रामपंचायत सदस्या गंभीर जखमी झाली. तालुक्यातील वांजरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित वर्षा हनुमान परचाके (47) या वांजरी येथील रहिवासी असून त्या ग्रामपंचायत सदस्य आहे. बुधवारी दिनांक 11 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास वर्षा या गावातील रस्त्याचे बांधकाम पाहण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान तिथे गावातीलच बंडू बन्सी सिडाम हा तिथे हजर होता. तो मोबाईलवर व्हिडीओ घेत होता. तो संरपंच, उपसरपंच यांना शिविगाळ करीत वर्षा यांच्याजवळ पोहोचला. वर्षा यांनी शिविगाळ करून का बोलतोय? अशी विचारणा केली असात त्याने मी सर्वसामान्य नागरिक आहे. मला बोलायचा अधिकार आहे असे उत्तर दिले. 

वर्षा यांनी तुम्हाला जे विचारायचे ते विचारा पण शिविगाळ करून विचार नका असे बंडूला म्हटले. मात्र बंडू चांगलाच भडकला. बंडूने रागाच्या भरात बाजूला असलेले फावडे उचलले व फावड्याने वर्षा यांच्या डोक्यावर वार केला. डोक्याला मार लागल्याने वर्षा खाली पडल्या. बंडू फावड्याने आणखी वार करणार तेवढ्यात वर्षाचे पती मध्ये आले व त्यांनी फावडे पकडले. दरम्यान या वादात बाजूला उभी असलेली बंडूची पत्नीही मध्ये आली. तिने वर्षा यांना केस पकडून मारण्यास सुरुवात केली व तिचे डोके खाली जमिनीवर आपटले.

वर्षाचे पती व स्थानिक गावक-यांनी मारहाण करणा-या पती-पत्नीला मारण्यापासून रोखले. वर्षांच्या पतीने वर्षाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले. उपचाराला जाण्याआधी वर्षा यांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी बंडू बन्सी सिडाम व त्याची पत्नी सविता बंडू सिडाम या पत्नी पत्नीविरोधात बीएनएसच्या कलम 109, 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला.  

RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.