ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

0
रवि ढुमणे, वणी: वणीतील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातून एका नवजात बाळाची चोरी झाली. हे बाळ केवळ दोन दिवसांचं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबऴ माजली. या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  रुग्णालयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असून रुग्णकल्याण समितीच्या उदासीन धोरणामुळेच असे प्रकार घडायला लागले आहेत.

 

सविस्तर वृत्त असे की वणी येथे रजा नगर हिंगणघाट येथून नुसरत अब्दुल सत्तार ही महिला प्रसुतीसाठी वणीत आली होती. रविवारी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास नुसरतच्या बिछान्यावरून बाळाची चोरी झाली. सर्व झोपेत असताना हा प्रकार घडला. जेव्हा नुसरतला जाग आली तेव्हा रुग्णालयात एकच कल्लोळ माजला. शोधाशोध सुरू झाली परंतु बाळाचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

परंतु रात्री बाळाची चोरी होते आणि कर्तव्यावर असलेल्या परिचारिका, डॉक्टर,आणि सुरक्षा रक्षक गेले कुठे होते हाच खरा प्रश्न आहे. रात्रपाळी कामावर असलेले अधिकारी कर्मचारी केवळ हजेरी लावून मोकळे होतात आणि असे प्रकार घडतात असाच प्रत्यय येथे आला आहे.  मागील काळात येथील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने असाच प्रकार घडला होता. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा बाळ परत देण्यात आले होते.

बाळ गोंडस असल्याने हे बाळ चोरीला गेव्याचा तर्क सध्या लावण्यात येतोय. घटनेला पूर्णतः कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याचे आरोप सामान्य जनतेतून होत आहे.  एकूणच वणीचे ग्रामीण रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.