मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ग्रामसेवक संघटनेकडून मदत
3 शेतकऱ्यांच्या पत्नीला 15 हजारांची मदत
राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यात कीटकनाशकाच्या फवरणी दरम्यान झालेल्या विषबाधेत तीन व्यक्तिंना जीव गमवावा लागला. या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना झरी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेकडून आर्थिक मदत करण्यात आली. तिन्ही कुटुंबियाना प्रत्येकी पाच हजार रूपये देण्यात आले आहे.
माथार्जुन येथील गजानन नैताम यांच्या पत्नीला, दिग्रस येथील विषबाधा झालेला शेतमजूर मधुकर बावने व निमणी येथील कैलास पेंदोर यांच्या पत्नीला प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. फूल नाही तर फुलाची पाकळी या भावनेने ग्रामसेवक संघटनेने ही आर्थिक मदत केली आहे.
झरी तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष के.आर. जाधव, उपाध्यक्ष जी. एस मुके, सचिव व्ही. बी. उईके, जिल्हा प्रतिनिधि आर.डी. पाटिल, सदस्य आय. व्ही. सय्यद, के.व्ही. चांदेकर, गबारकर, ठाकरे, टाले, डोनेकर, वाढई, घाटोळे, कोडापे, मसराम, निकम, वानखेड़े, सिर्तावार, वेट्टी. व झरी ग्रामसेवक संघटना यांनी ही मदत केली आहे.