महाशिवरात्रीला निघणार वणी ते शिरपूर भव्य त्रिशूल पदयात्रा

200 किलोंचा त्रिशूल राहणार प्रमुख आकर्षण, पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 18 फ्रेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त वणी ते महादेवगड (शिरपूर) अशी 15 किलोमीटरची त्रिशूल पदयात्रा निघणार आहे. बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 9 वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथ स्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी ते शिरपूर असा या त्रिशूल रॅलीचा मार्ग राहणार आहे. या पदयात्रेचे प्रमुख आकर्षण हे 200 किलोचा त्रिशूल असणार आहे. हा त्रिशूल खांद्यावर घेऊन सर्व भाविक वणी ते शिरपूर अशी पदयात्रा काढणार आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी परिसरातील लोक महाशिवरात्र महादेवगड शिरपूर येथे जाऊन साजरी करतात. या वर्षी भव्य असा त्रिशूल खांद्यावर घेऊन भाविक महादेवाच्या दर्शनाला जाणार आहे. विविध सामाजिक संघटनेच्या सहकार्य व पुढाकारातून ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. वणी ते शिरपूर अशा निघणा-या मार्गात बाहेर गावातील भाविक देखील जुळणार आहेत. ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत केले जाणार आहे.

पहिल्यांदाच अशा पद्धतीची पदयात्रा – तारेंद्र बोर्डे
या वर्षी पदयात्रा करून महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. या यात्रेची संपूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेत सहभागी होणा-या सर्व भाविकांची काळजी आयोजकाद्वारे घेतली जाणार आहे. इच्छुक भाविकांनी टागोर चौक येथील त्रिशूल यात्रेच्या कार्यालयात गोळा व्हावे. – तारेंद्र बोर्डे, माजी नगराध्यक्ष

त्रिशूल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुणाल चोरडिया, अनिल अक्केवार, नीलेश परगंटीवार, सुभाष बिलोरिया, अनुज मुकेवार, अनिल रेभे, गणेश धानोरकर, लवलेश लाल, जयेश चोरडिया, मनिष गायकवाड, संजय चिंचोळकर, जयंत सोनटक्के, सारंग बिहारी, विशाल दुधबळे, संभा वाघमारे, जनार्धन थेटे, गुंजन इंगोले, नीलेश होले, हरिष मोहविाय, अमोल धानोरकर, राज चौधरी, प्रज्वल ठेंगणे, वैभव मांडवर, शरद ढुमणे, आशिष ठाकूर, विकास चांदवडकर, निखील खाडे, अथर्व मोरे इत्यादींनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध सामाजिक संघटनेचे सदस्य परिश्रम घेत आहे.

अधिक माहितीसाठी व पदयात्रे सहभागी होण्यासाठी भाविकांना 9822200864, 7719995592, 9823049659 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.