मुकुटबन येथे परराज्यातील 11 कुटुंबांना अन्नधान्य वाटप

मुलीचा वाढदिवस अन्नधान्य वाटप करून साजरा

0
सुशील ओझा, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश म्याकलवार यांनी मुलीच्या वाढदिवसाला 11 कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करत वाढदिवस साजरा केला आहे. रविवारी परराज्यातून सध्या मुकुटबन येथे अडकलेल्या 11 कुटुंबियांना हे साहित्य पुरवण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

देशात कोरोनाच्या दहशतीने लॉक डाऊन करण्यात आले आहे. ज्यामुळे शिक्षण व नोकरी, कामानिमित्त महाराष्ट्रातील लोक इतर राज्यात अडकुन आहेत. तर इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात अडकून बसले आहे. तर गोरगरीब लहान दुकानदार व मजुर वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

मुकूटबन येथे गेले अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेश मध्यप्रदेश व इतर राज्यात लोक पाणीपुरी, भेल आईस्क्रीम, लिंबूपाणी, कुल्फीचे दुकान लावून आपले जीवन जगत होते. परंतु लोकडाऊन मुळे त्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडले ज्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच आपल्या गावककडे जाण्याकरिता पैसे नाही व परवानगी नाही. ज्यामुळे मोठ्या अडचणीत सापडले होते.

सदर कुटुंबियां बाबत कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापती प्रकाश म्याकलवार यांना माहिती मिळाली. यावरून म्याकलवार यांनी माणुसकीची जाण ठेवत सर्व कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप करण्याचे निर्धार केला व आज ५ एप्रिल रोज त्यांनी आपली मुलगी सलोनी हिच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय मुकूटबन येथे अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम झाला.

यवतमाळ चे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव ठाणेदार धर्मा सोनुने, सहा गटविकास अधिकारी इसलकर, सरपंच शंकर लाकडे ,प्रकाश म्याकलवार, भूमारेड्डी बाजनलावार, सुनील ढाले, मधुकर चेलपेलवार, नागेश अक्केवार, संजय आकिनवार, रविंद्र तिपर्तीवार यांच्या उपस्थितीत सलोनी म्याकलवार व अतिथीच्या हस्ते ११ कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

तसेच बचत गटांच्या महिलांना राजेश कुलकर्णी व इतर अधिकारी यांच्या हस्ते मास्क तयार करून मोफत वाटण्याकरिता कापड प्रदान केले. म्याकलवार यांनी केलेल्या कार्याप्रमाणे इतरही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावे जेणे करून गरीब व गरजू लोकांचे भले होईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.