जैन सोशल आर्गनाईजेशन 600 धान्याच्या किटचे वाटप
प्रशासनाकडून गरजूंची यादी घेऊन मदत कार्य सुरू
जब्बार चीनी, वणी: अनाथ, गरजू आणि असाहाय्य लोकांची सेवा करणे हिच खरी मानवता म्हटली जाते. मानव सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे हे ब्रीदवाक्य घेऊन जैन सोशल आर्गनाईजेशन वणी शाखे कडून गरजूंना धान्य वाटप करण्याचा उपक्रम उत्साहाने सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे तालुक्यात कोणी उपाशीपोटी राहणार नाही याबाबत प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या गरजूंकडे रेशन कार्ड नाही. अशा कुटूंबाचा तपशील तहसीलदारांकडून घेऊन अशा गरजूंना गावोगावी अन्न धान्याच्या किटचे वितरण जैन सोशल आर्गनाईजेशन तर्फे सुरू आहे.
या किट मध्ये 5 किलो पीठ, 500 मिली तेल, 2 किलो तांदूळ, मीठ, हळद, मिर्ची व मसाला याचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ 20 लोकांच्या गटाने 600 किटचे वितरण केले आहे. त्यापुढे सेवा करण्याचे एक मोठे ध्येय आहे. मानव सेवा सर्वात मोठा धर्म हेच आपले लक्ष्य मानून त्यांनी याआधी भामरागढ येथील पुरग्रस्तांना देखील मोठी मदत केली होती.