गावठी हातभट्टीवर पाटण पोलिसांचे धाडसत्र

20 लिटर 8 हजार 880 रुपयांची दारू जप्त

0

सुशील ओझा, झरी: शिबला गावाजवळीत जंगलात पाटण पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकली.  तर राजणी फाट्यावर गावठी हातभट्टी दारू घेऊन जाणाऱ्या 4 इसमांवरही पाटण पोलिसांनी कार्यवाही केली. त्यांच्याकडून 20 लिटर 8 हजार 800 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तीन आरोपी वणीचे आहे.

पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला गावाजवळील जंगलात हातभट्टीची गावठी दारू काढत असल्याची माहिती ठाणेदार यांना मिळाली होती. त्यावरून ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पाथोडे, अंकुश दरबस्तेवार, हेमंत कामतवार, होमगार्ड मो इरफान मो युसुफ, राजु गुडेवार, आकाश ननुरवार यांना घेऊन पहाटे 3 वाजता मोटरसायकलने राजनी जंगलात धाड टाकली. पोलीस येताच दारू विक्रेते जंगलात पळून गेले. हातभट्टीजवळ कुणीही मिळाले नाही. तेथील मोहाचा सडवा हातभट्टीचे साहित्य पोलिसांनी पूर्ण नष्ट केला.

दारू नेणा-या चौघांना अटक

राजनी फाट्याजवळ दोन व्यक्ती प्लास्टिकच्या दोन कॅनमध्ये गावठी दारू घेऊन जात असल्याचे आढळले. त्याला पकडून अटक करण्यात आले. तर तिथूनच दोन किलोमीटर अंतरावर दोन व्यक्ती अजून दोन कॅन गावठी दारू घेऊन जात असल्याचे आढळल्याने त्यांनाही ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळूनही पाच पाच लिटरचे दोन कॅन जप्त करण्यात आले. चार व्यक्तींकडून पोलिसांनी 20 लिटर 8 हजार 800 रुपयांची दारू जप्त करून सुभाष संभाशिव बोबडे रा. रासा, रमेश मारोती करमनकर रा. शास्त्री नगर वणी, अरुण नारायण मोरे रा. गोपी नगर वणी व अहमद शाह चंदुशाहा रा. शास्त्री नगर वणी यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.

ही कार्यवाही ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कर्मचारी यांनी केली असून पुढील तपास जमादार रमेश पिदूरकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.