गरजूंसाठी अन्नधान्याच्या 2 हजार किट महसूल विभागाकडे सुपुर्द

खा. बाळू धानोरकर यांच्या निर्देशानुसार नगर पालिकेने तयार केल्या किट

0

वणी बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये बुधवारी दिनांक 22 एप्रिल रोजी महसूल विभागाला जिवनावश्यक वस्तूंच्या 2 हजार किट सुपुर्द करण्यात आल्या. परिसरात इतर राज्यातील व बाहेर गावातील अनेक लोक अडकलेले आहेत. त्या सोबतच लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक नागरिकांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गरजू लोकांपर्यंत या किट पोहोचवल्या जाणार आहे. त्या बाबत मिटिंग घेऊन उपाययोजना करण्याबाबत खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी निर्देश दिले होते.

संपूर्ण देशात सध्या कोव्हीड 19 या विषाणूमुळे लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे प्ररप्रांतातील कामानिमित्त आलेले अऩेक मजूर परिसरात अडकलेले आहेत. याशिवाय शहरातील नागरिकांवर रोजगार गेल्याने कठिण परिस्थिती आली आहे. याबाबत दिनांक 14 एप्रिल, 16 एप्रिल व 18 एप्रिल रोजी खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी प्रशासकीय अधिका-यांची मिटिंग घेऊन परिसरात कुणीही उपाशी राहू नये याबाबत सूचना केली होती. तसेच गरजू लोकांना यादी तयार करून त्याबाबत अन्नधान्याच्या किट तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार नगरपालिकेने गरजू लोकांची यादी तयार करून 2 हजार किट तयार केल्या.

बुधवारी 22 एप्रिल रोजी कल्याण मंडपम येथे या किट महसूल विभागाकडे सुपुर्द करण्यात आल्या. या किट महसूल विभागाच्या माध्यमातून परिसरातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते या किट देण्यात आल्या. यावेळी सुशील कुमार नायक एसडीपीओ वणी, शाम धनमने तहसिलदार वणी, वैभव जाधव पोलीस निरीक्षक, संदीप बोरकर मुख्याधिकारी नगर पालिका वणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी शिक्षक संघटनेचे कर्मचारीही उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.