पुनवट येथे गुढीपाडवा महोत्सवाला सुरुवात
त्रैदिवशीय महोत्सवाचे आयोजन, विविध कार्यक्रमांची रेलचेल
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील पुनवट येथे गुढीपाडवा त्रैदिवशीय महोत्सवाला आज गुरुवारी दिनांक 31 मार्चपासून सुरूवात झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत हा महोत्सव चालणार आहे. यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आज सकाळी ग्रामस्वच्छता अभियानाने या महोत्सवाला सुरूवात झाली तर दुपारी अवधूत महाराजांची महाआरती घेण्यात आली. दुपारी 2 वाजता स्थानिक भजनी मंडळ गुरुदेव अवधूत महाराज या मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर रात्री रुखमाई महिला मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता अवधूत महाराजांच्या महाआरतीने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता श्रावणबुवा समाधीस्थळ येथे ध्वजारोहण व आरतीचा कार्यक्रम होणार आहे. दपारी 2 वाजता स्थानिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम तर 7 वाजता अवधूत महाराज आरती होणार आहे. या दिवशीचे प्रमुख आकर्षण हे नागपूर येथील सप्त खंजेरी वादक प्रबोधनकार जानकीताई सोपान घुमे यांच्या कीर्तन राहणार आहे.
शनिवारी दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अवधूत महाराजांच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 9 ते 12 वाजेपर्यत महाआरती, ध्वजारोहण व सावंगी येथील अवधूत भजन मंडळाचे भजन, दुपारी 2.30 वाजता श्रावणबुवा समाधीस्थळावर आरती, दु. 3 वाजता क्रिष्णानपूर येथील भजनी मंडळाचे भजन होणार आहे. तर 4 वाजता अवधूत महाराजांचा पालखी सोहळा आहे. संध्याकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
या महोत्सवला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. राज मडावी, स्नेहा मडावी व समस्त पुनवट येथील गावक-यांनी केले आहे.
Comments are closed.