अँटी रॅगिंग व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन शिबिर

विधी व सेवा प्राधिकरण व वाहतूक उपशाखेतर्फे लॉयंस इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जितेंद्र कोठारी, वणी : विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जाणीव तसेच शाळा महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंग रोखण्यासाठी अमलात आणलेले अँटी रॅगिंग कायद्याची माहिती देण्यासाठी विधी व सेवा प्राधिकरण व वाहतूक उपशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने लॉयंस इंग्लिश मिडीयम शाळेत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार 24 ऑगस्ट रोजी करण्यात आले.

या मार्गदर्शन शिबिरात विद्यमान न्यायाधीश सुधीर बोमिडवार, प्रथम श्रेणी न्यायालय वणी यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999 बाबत सविस्तर माहिती दिली. या कायद्यानुसार महाविद्यालय, शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या सर्व संस्था, अनाथालय, निवासी शाळा किंवा वसतिगृह, कोचिंग क्लास किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारात किंवा आवाराबाहेर रॅगिंग करणे प्रतिबंधित आहे.

रॅगिंग म्हणजे शारीरिक किंवा मानसिक इजा पोहचवणे, छेडछाड, गैरवर्तन, धमकी किंवा त्या विद्यार्थ्याला दुखावणारे विनोद अथवा टिंगल करणे. एखाद्या विद्यार्थ्याला अशी कृती करायला सांगणे जी तो नेहमी करत नाही. अशी कृती करणाऱ्या दोषी विद्यार्थाला शैक्षणिक संस्थेतून 5 वर्षासाठी बडतर्फ केल्या जाते. त्याला गुन्हा सिद्ध झाल्यास 2 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांपर्यंत दंडाचा प्रावधान या कायद्यात आहे.

अलीकडच्या काळात अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहन चालविण्याचे क्रेझ वाढले आहे. परंतु वाहतूक नियमांचा पुरेशा ज्ञान नसल्यामुळे अनेकदा अपघात होऊन जीवितहानी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे 18 वर्षाखालील मुलांनी दुचाकी, चारचाकी वाहने चालवू नये. अल्पवयीन वाहन चालकाच्या हातून अपघात घडल्यास त्याच्या आईवडिलांना दोषी मानल्या जाते. शाळेत येता जातांना विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आव्हान यावेळी वाहतूक उप शाखा प्रमुख सपोनी संजय आत्राम यांनी शिबिरात केले. यावेळी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रशांत गोडे व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपसथित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.