सरपंच जे करू शकते ते पंतप्रधान नाही: भास्कर पेरे पाटील

● गुरुदेव अर्बन निधी लिमिटेड तर्फे सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: लोकशाहीमध्ये ग्राम पंचायतीला असिमीत अधिकार देण्यात आले आहे. ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच याना आपल्या अधिकाराची जाणीव झाली तर गावाला विकासापासून कोणीही वंचित करु शकत नाही. सरपंच जे करू शकते ते पंतप्रधान ही करु शकत नाही. मात्र दुर्देवाने बहुतांश सरपंच ग्राम सचिवाची बॅग धरून त्याच्या मागे मागे चालत असल्याचे चित्र दिसत आहे. अशी खोचक टीका आदर्श ग्राम पंचायत पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केली. गुरुदेव अर्बन निधी लिमिटेड तर्फे स्थानिक शेतकरी भवनमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी पेरे पाटील बोलत होते.

या कार्यक्रमात कोरोना काळात हुतात्मा झालेले तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या पत्नीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार बाळू धानोरकर, आमदार वजाहत मिर्जा, सत्कारमूर्ती भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सांत्वन करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व गुरुदेव अर्बन निधी लिमिटेड संस्थेचे संस्थापक टीकाराम कोंगरे यांच्या वाढदिवसही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

भास्कर पेरे पाटील म्हणाले की आतापर्यंत महाराष्ट्रात 7 हजार आमदार झालेत मात्र त्यांना त्यांचे स्वत:च्या गावच्या स्वच्छते कडे लक्ष नसते. त्यामुळे गावाच्या विकासाची मदार ही संपूर्णत: ग्रामपंचायतीवर असते. त्यामुळे गावाच्या विकासाबाबत सरपंचाची जबाबदारी ही पंतप्रधानापेक्षाही मोठी असते असेही भाष्य त्यांनी सरपंचाच्या कर्तव्याबाबत केले.

खासदार धानोरकरांची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका
सन्मान सोहळ्याचे मुख्य अतिथी खासदार बाळू धानोरकर यांनी कृषी कायदे मागे घेण्यावरून केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली. पंतप्रधान मोदीवर जोरदार हल्ला चढविला. कृषी कायदे, पेट्रोल डीझलचे भाव, गैस सिलेंडर व महागाई वरून त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

सत्कार सोहळ्यानिमित्त निवडणूक मॉकड्रिल
जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांचा वाढदिवस आणि सरपंच उपसरपंच सन्मान सोहळा हा येत्या नगरपरिषद, नगर पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मॉकड्रिल असल्याचे दिसून आले. तालुक्यातील 72 सरपंच उपसरपंच यांचे सत्कार करून काँग्रेस पक्षाने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावेळी अनेक गावातील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार वजाहत मिर्जा, खासदार बाळू धानोरकर, चंद्रपूर जि. प. चे विरोधी पक्षनेते सतीश वारजूरकर, इंटक अध्यक्ष विनोद पटोले यांच्या भाषणातही निवडणुकीची किनार जाणवली.

यावेळी व्यासपिठावर खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार वजाहत मिर्जा, माजी आमदार वामनराव कासावर, महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष विनोद पटोले, जि. प. चंद्रपूरचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर, रंगनाथ स्वामी बँकेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, जि. प. सदस्य अरुणा खंडाळकर, माजी जि. प. सभापती नरेंद्र ठाकरे, आशिष मोहितकर, प्रमोद वासेकर, इजहार शेख, राजीव कासावार, आशिष खुळसंगे, विवेक मांडवकर, संजय खाडे, सुनील वरारकर, यांच्यासह सरपंच, उपसरपंच यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

सकाळी एकाला काठीने मारहाण, रात्री फावड्याने मारहाण करून घेतला बदला

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.