माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करत महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

पीडित महिला प्रिया राजू लोढे (27) रा. राजूर (ई) ह.मु. तैलीफेल वणी यांनी याबाबत 2 एप्रिलला वणी पो.स्टे. येथे तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार पीडितेचा पती राजू मारोती लोढे हा मोटरसायकल व घर बांधण्यासाठी वडिलांकडून पैसे आणण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून तिला शिवीगाळ व मारहाण करायचा. तसेच सासू, सासरा, जाऊ, नणंद व भासरा पीडितेच्या पतीला नेहमी भडकावून तिचा छळ करायचे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेनी पती राजू मारोती लोढे (32), मारोती लोढे (58), सारुबाई मारोती लोढे (55), सविता प्रेमानंद भोयर (30), गजू मारोती लोढे (40), वर्षा गजू लोढे (35) व सुरेखा छत्रपती मिलमिले (45) विरुद्द तक्रार नोंदवली. पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्द कलम 498 (अ), 504, 506, 34 भादवि अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय जगदीश बोरनारे करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.