चिखलगाव येथील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
500 पेक्षा अधिक रुग्णांनी केली तपासणी
विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील बोधे नगरमध्ये आज मंगळवारी भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात 500 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. जय महाकाली माता मंडळ चिखलगाव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा शाखा चिखलगावच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. बालकांपासून ते वृद्ध अशा सर्वच वयोगटातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला
दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, महेश पिदूरकर, सिराज सिद्धिकी यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांची तपासणी करून उद्घाटन करण्यात आले. रुग्णांची तपासणी डॉ. महेंद्र लोढा स्त्री रोग तज्ज्ञ, डॉ. सुबोध अग्रवाल अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. किशोर व्यवहारे सर्जरी तज्ज्ञ, डॉ. पवन राणे बालरोग तज्ज्ञ, डॉ. पंधरे जनरल फिजिशियन, डॉ. विना चवरडोल, डॉ. गणेश लिमजे हृदयरोग व मधूमेह तज्ज्ञ यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना लोढा हॉस्पिटलच्या संपूर्ण चमूने सहकार्य केले. शिबिरामध्ये तपासणीसाठी अत्याधुनिक मशिनची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा ‘वणी बहुगुणी’शी बोलताना म्हणाले की….
या शिबिरात सुमारे 500 रुग्णांपैकी 15-20 रुग्णांना गंभीर आजार असल्याचे निदान झाले आहे. या गंभीर रुग्णांना पुढे येणारा संपूर्ण खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महांकाली मंडळ करणार आहे. तसेच 8-10 रुग्ण हे कर्णबधिर असल्याचे समोर आले आहे. त्यांना ही लवकरच आम्ही कर्ण यंत्राचं वाटप करणार आहोत.
महांकाली मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल धुर्वे वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की गेल्या आठ वर्षांपासून आम्ही विविध लोकोपयोगी उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवत आहोत. यापुढेही आम्ही असेच सामाजिक उपक्रम राबवण्यावर आमचा भर असणार आहे. उद्या बुधवारी सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. तर 19 ऑक्टोबरला इथे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्यात संपूर्ण गावासह लालपुलिया परिसरातील कामगार ही मोठ्या संख्येने सहभागी असतात. अशी माहिती ही धुर्वे यांनी दिली.
शिबिराच्या यशस्वितीतेसाठी स्वप्निल धुर्वे, सोनू निमसटकर, सतिश पुसदकर, आशुतोष धुर्वे, राहुल जयस्वाल, राजू उपरकर, अविनाश कातकडे, हर्षद इखारे, आशिष मुके यांच्या सह लोढा हॉस्पिटलची चमू आणि दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.