पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांनी आपली तपासणी केली. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज बडोदेकर, डॉ. एस जमिल अहमद, डॉ. एस नदीम अहमद यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात प्रत्येक रुग्णांची बीपी, एसीजी व सुगर इत्यादी तपासणी करून रुग्णांच्या रोगाचे निदान करण्यात आले व त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मुकुटबन येथील प्रदीप मेडिकल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कॅम्पमध्ये मधूमेह, हृदयरोग, यकृतरोग, दमा, मुत्रपिंड, लकवा, सर्दी-खोकला, ऍसिडिटी, संधीवात, डोकेदुखी इत्यादी रोगांवरचे तपासणी करून निदान करण्यात आले. विदर्भातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट व कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. रोहीत चोरडिया, MBBS, MD (Medicine) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. झरी तालुक्यातील विविध गावातील तसेच मुकुटबन येथील रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. जमिल शेख, डॉ. सय्यद आतिक यांच्यासह प्रदीप मेडिकल मुकुटबनचे किशोर कोठारी यांचे विशेष सहकार्य लाभले. लवकरच यापुढेही असेच आरोग्य शिबिर घेण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली.
डॉ. रोहित चोरडिया यांची दर रविवारी वणीत रुग्ण तपासणी
सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन, मधूमेह व हृद्यरोगतज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडीया यांची दर रविवारी वणीत विशेष व्हिजिट राहणार आहे. वणीतील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प समोरील ट्रु केअर पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलमध्ये ते डायबिटीज (मधूमेह), हृदयरोग, वात, दमा, यकृतरोग (किडणी), लकवा, संधीवात (आर्थरेटीस), तीव्र ऍसिडिटी इत्यादी विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करतात. दुपारी 12 ते 3 वाजपर्यंत तर संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत या वेळेत रुग्णांना तपासणी करता येणार आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.