आरसीसीपील सिमेंट फॅक्टरीतील १४४० कामगारांची आरोग्य तपासणी
ग्रामपंचायतच्या तक्रारीमुळे शासनाचे अधिकारी खलबळून जागे
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथे सर्वात मोठी सिमेंट फॅक्टरीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु लॉकडाऊन मुळे एक महिन्यापासून फॅक्टरीचे काम बंद ठेवण्यात आले होते. आठवडा पूर्वी समेंट कंपनीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. फॅक्टरीत काम करणारे काही कर्मचारी अधिकारी मुकूटबन व वणी वरून चारचाकी वाहनाने ये-जा करीत आहे.
ग्रामवासीयांना कामगार व बाहेरून येणाऱ्या अधिका-यांपासून होणारा धोका लक्षात घेऊन सरपंच शंकर लाकडे याबाबत तहसीलदार व ठाणेदार यांना तक्रार दिली होती. त्यामुळे आरोग्य पोलीस पंचायत विभागातील अधिकारी खळबळून जागे झाले व तक्रार दिल्या दिवसापासूनच आरोग्य विभागाची चमू सिमेंट फॅक्टरीत जाऊन ४ व ५ मे या दोन दिवसात १४४० कामगारांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले.
कंपनीतील कामगार यांना पोलीस मार्फत धमकविल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी कंपनीतील सर्व कामगारांनी आपल्या गावकडे जाण्याकरिता एल्गार पुकारला होता परंतु त्यावेळी वणी उपविभागतील पाचही पोलीस ठाण्यातील संपूर्ण पोलीस ताफा बोलावून प्रेशर टाकून मजुरांना शांत करण्यात आले होते. सिमेंट फॅक्टरीतील मजुरांची तपासणी तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांच्या नेतृत्वात डॉ पंडित, डॉ देवतळे, डॉ ढगले, डॉ जमीर शेख, डॉ चेतन लॅब टेक्निशियन, मदतनीस, आरोग्यसेवक बचकूलवार, सूर्यवंशी ,तुमकोड यांनी केले तर सोबत सहा गटविकास अधिकारी इसलकर ,ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव व पंचायत समिती कर्मचारी उवस्थित होते.
हे पण वाचा -‘सिमेंट कंपनीतील कामगारांमुळे ग्रामवासीयांना कोरोनाचा धोका’