वणी: पंचायत समिती आरोग्य समिती वणीच्या वतीने चिखलगाव येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. पंचायत समिती वणीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी राजेश गायनर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनात जि.प. शाळा चिखलगाव येथे घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात 508 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प. आरोग्य समितीचे सदस्य बंडूभाऊ चांदेकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. आरोग्य समितीच्या सभापती नंदिनी दरने, प.स.सभापती लिशाताई विधाते, जि.प. सदस्या मंगला दिनकर पावडे, संघदीप भगत, प. स. सदस्य शिलाताई कोडपे, चंद्रज्योती शेंडे, माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला पुसनाके , प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार, रवी येरणे, डी.डी.कोसे प्रामुख्याने उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात 53 गरोदर माता, 68 लहान बालके, 198 विदयार्थी व इतरांची रक्त गटाची तपासणी , 28 व्यक्तीची शुगर चाचणी, 73 व्यक्तींची दंत तपासणी, 90 स्त्रियांची हिमोग्लोबीनची तपासणी अशा प्रकारे एकूण 508 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी उदघाटक आ. बोदकुरवार व अध्यक्ष चांदेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रामीण परिसरातील सर्वसामान्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या शिबिराचे आयोजक संजय पिंपळशेंडे यांनी अशा प्रकारच्या आरोग्य शिबीराचे नियमित आयोजन करून या तालुक्यातील सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जाणार असल्याचे सर्वाना आश्वस्त केले.
शिबिरात संचिता नगराळे, संकेत अलोणे, मनीष भगत, निलेश ढुमणे, ललित लांजेवार, मंगेश चिंचोळकर, अतिक सय्यद, या खाजगी डॉक्टरांनी आपली विनामूल्य सेवा दिली. राजूरचे वैद्यकीय अधिकारी तुषार ठाकरे प्रयोगशाळा सहायक शैलेश सहारे, बाळ लोखंडे यांनी या शिबिरात रुग्णांची तपासणी केली.
या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विकास कांबळे यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी डॉ. चंद्रकांत आंबेकर यांनी केले. आभार प्रदर्शन आरोग्य सहायक अरुण डवरे यांनी केले.