रेस्टहाऊस समोर भीषण आग, मध्यरात्रीची घटना

तारेंद्र बोर्डे यांच्यामुळे टळला अनर्थ...

निकेश जिलठे, वणी: रेस्ट हाऊस समोर मध्यरात्री भीषण आग लागली. घटनास्थळाच्या बाजूलाच ट्रॅव्हल्स थांबलेल्या असतात. शिवाय याच्या बाजूलाच पेट्रोल पम्प आहे. याच वेळी रस्त्याने माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे घरी परतत होते. त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत एक टेबल जळून खाक झाला तसेच रस्त्यावरील झाडाचे मोठे नुकसान झाले.  

बस स्टँडच्या बाजूलाच रेस्ट हाऊस आहे. सोमवारच्या रात्री म्हणजे मंगळवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री 12.45 वाजताच्या सुमारास रेस्ट हाऊसच्या गेटच्या बाजूला अचानक आग लागली. आगीत इथे ठेवलेल्या एका टेबलने पेट घेतल्याने आग वाढत गेली. आगी लागल्याच्या अवघ्या काही अंतरावरच धनश्री ट्रॅव्हल्सची वणी-नागपूर ही ट्रॅव्हल्स उभी होती.  

अन् अनर्थ टळला…
आग लागली तेव्हा ट्रॅव्हल्सचे चालक अयाज खान हे कॅबिनमध्ये झोपून होते. मात्र आग लागल्याचे तारेंद्र बोर्डे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ कॉल करून फायर ब्रिगेडला बोलवले. तसेच ट्रॅव्हल्समध्ये झोपलेल्या चालकाला उठवले. चालकाने तात्काळ ट्रॅव्हल्स घटनास्थळापासून दूर नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

माहिती मिळताच फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी पोहोचली. काही वेळातच आग विझवण्यात आली. फायर ब्रिगेड चालक देविदास जाधव, फायर फायटर सौरभ पानघाटे, फायर फायटर दीपक वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत एक टेबल जळून खाक झाला तसेच रस्त्यावरील झाडाचे मोठे नुकसान झाले. 

आग कशाने लागली?
आग कशाने लागली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक मोकळ्या जागेवर कचरा व इतर वस्तू गोळा करून शेकोटी पेटवतात. शेकोटी संपल्यानंतर बरेचदा ही शेकोटी विझवण्याकडे दुर्लक्ष होते. या शेकोटीने पेट घेतल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

29 डिसेंबरला T-10 चॅम्पियन लीगचा उद्घाटन सोहळा, गौतमी पाटील प्रमुख आकर्षण

गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू

Comments are closed.