मारेगाव शहरात धुवाधार पाऊस, पं.स. कार्यालयाला आले तलावाचे स्वरुप

गुडगाभर पाणी साचल्याने कर्मचा-यांची झाली पंचायत, नालीचे पाणी शिरले आवारात

1

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव शहरात धुवाधार पाऊस झाला. या पावसाने कार्यालयाच्या आवारात चक्क टोंगळभर पाणी साचले. हे दृश्य पंचायत समितीला जणू तलावाचे रूप आले असेच होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागच्या गेट पासून येजा करावी लागली. पंचायत समिती गेट समोरील नालीची सफाई न झाल्याने हे घडले.

गेल्या तीन चार दिवसांपासून मारेगाव तालुक्यात चांगला पाऊस होतोय. समितीच्या प्रवेशद्वारा समोरील नालीचे सफाई न झाल्याने गेल्या तीन चार दिवसांपासून प्रवेशद्वारा वरच पाण्याचे डबके साचले होते. दरम्यान आज 17 जुन रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास शहरात धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे पंचायत समितीचे संपूर्ण आवार पाण्याने भरून गेले. सायंकाळी तर कर्मचाऱ्यांना मागच्या गेट मधून घरी जावे लागले.

गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात पाणीच्या डबके साचले होते. मात्र याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. याबाबत नगर पंचायतीकडे कोणतीही तक्रार केली गेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे. समस्या सोडवणा-या कार्यालयातच जर अशी परस्थिती निर्माण होत असेल तर नागरिकांच्या प्रश्नांचे काय,? अशी प्रतिक्रिया सुज्ञ व्यक्तीकडून उमटत आहे.

हे देखील वाचा:

वणी जवळ आढळली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.