आज जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

वणी, मारेगाव झरी तालुक्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा

0

सुशील ओझा, झरी: नागपूरच्या हवामान खात्याने ६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार ६ व ७ सप्टेंबरला जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणतीही जीवितहानी व वित्तहानी होऊ नये ते टाळण्याकरिता जनतेनी दक्षता घेण्याचे आवाहन तहसील कार्यालया मार्फत करण्यात आले आहे.

नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. कोणत्याही अफवार विश्वास ठेवू नये किंवा खोट्या अफवा पसरवू नये, पावसामुळे मातीचे घरे लवकर पडतात त्यामुळे ज्यांचे मातीचे घर आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. पूर परिस्थिमध्ये लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये, नदी नाल्याला पूर आल्यास नदी नाले ओलांडू नये. ज्यामुळे जीवित हानी होऊ शकते, पूरपरिस्थिती मध्ये घरात पिण्याचे पाणी सुखे खाद्य पदार्थ (शेंगदाणे बिस्कीट, गुळ) साठा असावा, विजेच्या उपकरणाचा वापर करू नये किंवा विजेचा पुरवठा बंद करावा,

पुरपरिस्थितीत साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते ज्यामुळे पाणी उकळून प्यावे व अन्न झाकून ठेवावे, साथीच्या रोगापासून सौरक्षण प्राप्त झालेल्या औषधीचा योग्य वापर करावे, घरातील उपयुक्त समानासह उंच व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, आपत्तीच्या प्रसंगी जवळील तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,अग्निशमन दल किंवा जिल्हा नियंत्रण कक्षसी जनतेनी संपर्क करावे.

घरात असतांना वादळी वारा किंवा वीज चमकत असताना घराच्या खिडक्या दरवाजे बंद करावे, खिडक्या दरवाजे व कुंपण पासून दूर रहा, मेघगर्जना झाल्यापासून अर्धा तास ३० मिनिटे घरातच रहावे,
घराच्या बाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणी जावे, ट्रॅक्टर, शेतीचे अवजारे मोटरसायकल सायकल यांच्यापासून दूर रहावे, गाडी चालवत असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, उघड्यावर असल्यास लगेच गुडघ्यावर बसून दोन्ही हाताने कान झाकावे व डोके दोन्ही पायाच्या मध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळ्या तसेच लटकत्या तारापासून दूर रहावे, जंगलात असल्यास दाट लहान झाडाखाली उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.

वीज पडल्यास किंवा वज्रघात झाल्यास त्वरित रूग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवावे, वज्रघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावे तसे व्यक्तीस हात लावल्यास धोका नसतो,ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या सौरक्षकनात्मक थर ठेवावे,

गडगडाडीचे वादळ असल्यास, उंच जगावर, टेकडीवर, मोकळ्या जागेवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस ,साहिलीची आश्रय स्थाने, दळनवळनार्ची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने व पाणी टाळावे.

घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन/ मोबाईल व इतर इलेक्टिक / इलेक्ट्रनिक्स उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, वादळदरम्यान वीज चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये, या दरम्यान आंघोळ करणे हात धुणे कपडे धुणे करू नये, काँक्रीटच्या जमिनीवर झोपू नये, प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा, मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असतांना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये  तसेच इतर अनेक उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.