मांगरुळात महालक्ष्मींचा मोठा उत्सव

जवळपास घरोघरीच ज्येष्ठ गौरीपूजन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मांगरुळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी गौरी गणपती बसविण्याची पंरपरा अजूनही कायम आहे. दरम्यान ज्येष्ठागौरी पूजनाच्या दिवशी गावामध्ये सगळीकडे गणपती व महालक्ष्मीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम राहातो.

मारेगाववरून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर १ हजार १७४ लोकसंख्येचे व जवळपास ३०० घरांची वस्ती असलेले महामार्गालगत वसलेले मांगरूळ गाव आहे. या गावात ८० टक्के लोक सधन शेतकरी असून, उर्वरित मजूर, नोकरदार तर काही व्यापारीवर्ग आहे.

या गावाला जगन्नाथबाबा महाराजांचा वसा लाभल्याने येथील ग्रामस्थ मुळातच धार्मिकवृतीचे आहे. गावात डाखरे, आंबटकर, वट्टे, पोटे, ठेंगणे कुटुंबाची घरे अधिक आहे. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विवाहासाठी बाहेरगावाला जावून मूल-मुली न बघता गावातील मुला-मुलींसोबतच विवाह लावून दिला जातो.

गावाला जगन्नाथबाबा महाराज यांचा वारसा लाभल्याने गावात नेहमी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान गावातील घरोघरीच गणपती व गौरी बसविण्याची परंपरा पिड्यांपिड्या सुरू आहे.

यावेळी घरोघरी रोशनाई, रंगबिरंगी रांगोळी, बाहेरगाववरून आलेले आप्त नातलगांची रेलचेल पाहून येथे जणूकाही दिवाळी सण अनुभवायास मिळतो. मात्र, ज्येेष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गावात महालक्ष्मीसह गणपतीच्या भोजनाचे कार्यक्रम घरोघरीच राहात असल्याने गावातीलच माणसे जेवण करायला मिळत नसल्याचे वास्तव आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.