सणावाराच्या पार्श्वभूमीवर वणीच्या बाजारात उसळली गर्दी
सं. 5 वाजेनंतरही बाजार सुरु, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जितेंद्र कोठारी, वणी: आगामी सणावाराच्या निमित्ताने खरेदीसाठी वणीच्या बाजारपेठेत ग्राहकांची भयंकर गर्दी उसळल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. रविवार 28 मार्च रोजी होळी व 29 मार्च रोजी रंगपंचमी सण आहे. शनिवारी वणी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे शुक्रवारी शहरातील रस्त्यावर विविध खरेदीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणावर गर्दी झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात औषध व दुग्धजन्य पदार्थांची दुकाने वगळता इतर दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र हॉटेल, फळभाजी व इतर दुकाने सायंकाळी उशिरापर्यंत उघडी असताना त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. जिल्ह्यात कलम 144 व रात्रीची संचारबंदी लागू असताना नागरिक बेफिकीर रस्त्यावर फिरताना फिरत आहे.
शहरातील टिळक चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, टुटी कमान, भाजी मार्केट या जागी दिवसभर वाहतुकीची कोंडी असताना वाहतूक पोलीस कर्तव्यावर दिसत नाही. प्रशासनातर्फे हॉटेल व्यवसायाला फक्त पार्सल सुविधा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परन्तु शहरातील सर्वच हॉटेल व उपाहारगृहात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर करतांना दिसून आले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला असून कोरोना गेला की काय ? यक्षप्रश्न असा अनेकांना पडला होतो. नागरीकांची गर्दी पाहता कोरोनाची धोक्याची उंची वाढेल असे सुज्ञ नागरीकांकडून बोलले जात असून प्रशासनाकडून या गर्दीबद्दल योग्य तो सकारात्मक पुन्हा निर्णय घ्यावा, आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरीकांकडून होत आहे.