विवेक तोटेवार, वणी: धनोजे कुणबी महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजारांची मदत करण्यात आली. अध्यक्ष वंदना आवारी व त्यांच्या सहकार्यांतर्फे 51 हजारांचा धनादेश उपविभागाीय अधिकारी यांना सुपुर्द करण्यात आला.
सध्या कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना दरम्यान आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे. वणीतही या निधीसाठी भरभरून मदत केली जात आहे.
महिला आघाडीच्या या कार्याबाबत परिसरात कौतुक होत आहे. या साठी कविता चटकी, साधना मत्ते, मिनाक्षी देरकर, लता वासेकर तसेच माजी अध्यक्ष संध्या नांदेकर, किरण देरकर, साधना गोहोकार, वृंदा पेचे, माया गौरकार, ज्योती सुर, स्वप्ना पावडे, अर्चना बोदाडकर, संध्या बोबडे, वंदना व-हाटे, सुनिता बोढे, गीतांजली माथनकर, जयश्री अतकारे, नेहा गोखरे, मिना वरारकर.
तसेच गृप लीडर प्रमिला पावडे, शारदा आवारी, गीता मोहितकर, वर्षा देठे, अर्चना थेरे, वृंदा पोटे, गुड्डी देरकर, लतिका हेपट, ज्योती डाखरे, नंदा थेरे, ज्योती कुचनकर, मनिषा टोंगे, शारदा पहापळे, रिता पहापळे, माधुरी गोहने, प्रतिभा निमकर, सुषमा मोहितकर, अनिता पारखी, रेखा बोबडे, संगिता खाडे, गीता उपरे, उषा गोवारदिपे, सविता आवारी, वैशाली डांगे, कमल पावडे, निला भोयर आदिंनी सहकार्य केले.