नायगाव (बु) ग्रामपंचायततर्फे 51,470 रुपयांची मदत

लोकवर्गणीतून मुख्यमंत्री निधीला मदत

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नायगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना आपत्ती निवारणासाठी 51, 470 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधिला देण्यात आला. हा सर्व निधी ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून उभा केला आहे. जमा झालेल्या निधीचा चेक उपविभागीय अधिकारी वणी यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

कोविड – १९ या जागतिक आपत्तीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी जो निधी गोळा करण्यात आला त्यासाठी डॉ. विलास बोबडे, संजय डवरे, उमाजी देठे, संजय बोबडे, ज्ञानेश्वर देवतळे, अनिल वैरागडे, कबिर बोबडे इ यांनी पुढाकार घेतला व गावातून लोकवर्गणी गोळा करण्यात आली. ग्रामपंचायत व गावक-यांच्या या कार्याबाबत परिसतात कौतुक होत आहे.

कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना दरम्यान आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता‍ निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे. वणीतही या निधीसाठी भरभरून मदत केली जात आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

 वणी  बहुगुणी आता टेलीग्रामवर आहे. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या  व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.