गरिब आणि गरजुंच्या मदतीसाठी सरसावले नि:स्वार्थ हात
महिनाभराच्या किराण्यासह सॅनिटायझर, मास्कचे वाटप
जब्बार चीनी, वणी: कोरोनाबाधित रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने शासनाने जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, उद्योग_व्यावसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण आहे. परंतु या कुटुंबांसाठी शहरातील काही नि:स्वार्थ हात मदतीला सरसावले असून, त्यांनी महिनाभराच्या किराणा मालासह सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे.
शहरातील लाँयन्स क्लब, रोटरी क्लब, क्रांती युवा संघटना, सामाजिक कार्यकर्ते जमीर खान, इजहार शेख मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. शहरातील 150 लोकांनी प्रति व्यक्ती 2500 रू जमा करून एक कोरोना हेल्प ग्रुप बनविला आहे व तहसीलदार शाम धनमने यांच्या माध्यमातून 1100 कीट चे वितरण सुरू आहे. प्रत्येक किट्समध्ये 5 किलो पीठ, 2 किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, मीठ, सोयाबीन तेल, साखर, चहा पावडर, तिखट, हळद, साबण या वस्तूंचा समावेश आहे.
लाँयन्स क्लब जवळपास अशा तीन हजार कीट वाटत आहे. या अगोदर व्यापारी मंडळ व शिंपी समाजाने मास्क चे वितरण केले होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वैयक्तिक दोन लाख रूपये तर आमदार फंडातुन आरोग्य सेवेसाठी 50 लाख दीले आहे. येथील जैताई देवस्थाकडुन मुख्यमुत्री सहायता निधीत 21 हजार रूपये तर विजयबाबु चोरडीया यांच्याकडून पीएम केबर फंड मध्ये 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
वणीत टीफिनचेही वाटप
सध्या किराना वाटप होत असले तरी अनेक गरीब, निराधार, बेघर लोक आहेत. त्यांच्याकडे चूल पेटत नाही अशा लोकांना किराना मालाचा उपयोग नाही. अशा लोकांना रेडिमेड टिफिन मिळावे यासाठीही काही संघटना सरसावल्या आहेत. वणीत रोज शेकडो टिफिन अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे.
सध्या संपूर्ण देशात करोना विषाणू ने हाहाकार माजवला आहे.या आपात्कालीन स्थितीमध्ये देशातील गरीब कुटुंबांची परवड टाळण्यासाठी सर्व वणीकर सरसावले आहे. व्यापारासह सर्व प्रकारचा व्यावसाय बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाचालक, हमाल, बिगारी, मिस्तरी, मजूर, रोजंदारी कामगार , चौकाचौकातील हॉकर्स या सर्वावर उपासमारीचे वेळ आली आहे.
या सर्व गरीब कुटुंबांसाठी गेल्या सहा दिवसांत शेकडो कुटुंबांना किमान एक महिना पुरेल, एवढा किराणामाल मोफत वाटप केला जात आहे. त्यासोबतच सॅनिटायझर व मास्कचे देखील वाटप करण्यात आले आहे. ही मदत करतानाच सर्वाच्या वतीने या कुटुंबातील सदस्यांना आता बाहेर पडू नका, अशी सूचना देखील करण्यात येत आहे.