वणीतील मुख्य रस्त्यांवर वाढली वरदळ

अतिउत्साही महाभागांमुळे संचारबंदीचा फज्जा !

0

जब्बार चीनी, वणी: सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत आवश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर निघण्याची सुट दिल्यानंतर वणीकर त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. आज (मंगळवारी) शहरातील मुख्य रस्त्यावर संचारबंदी उठवल्यासारखे चित्र दिसून आले. लोक मुख्य रस्त्यावर परिस्थिती सामान्य असल्यासारखेच फिरत असल्याचे दिसून आले. शिवाय भाजी विक्रेत्यांकडेही लोकांनी एकच गर्दी केली होती. यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. दरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी पाहणी केली असता त्यांना ही विक्रेते आणि फिरणारे जुमानताना दिसले नाही. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना त्यांनी समज दिली व उद्या नियम न पाळल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

आज सकाळी शहरातील गांधी चौक, जटाशंकर चौक, आंबेडकर चौकात व अनेक भागांमध्ये वाहनांची वर्दळ इतर दिवसांच्या तुलनेने वाढलेली आहे. लोक बिनदिक्कत घराबाहेर पडत आहे. तीन दिवस जो शुकशुकाट  मुख्य रस्त्यावर दिसून येत होता. त्या शुकशुकाटाची जागा आज वर्दळीने घेतली. शहराच्या मुख्य रस्त्यांवर डबलसीटची संख्या वाढलेली दिसली.

दुपारी 3 नंतर काय आहे परिस्थिती?

शहरात लॉकडाऊनमुळे दुपारी तीन नंतर मुख्य रस्त्यावर अत्यंत शुकशुकाट दिसत आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना शहरातील मुख्य चौकांवर पोलिसांचे फटके पडत आहे. मात्र असे असले तरी शहरातील इतर अनेक भागांमधील नागरिकांमध्ये कोरोनाचे जराही गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. तसेच पोलीस यंत्रणेकडूनही काही भागांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे.

मेडिकल प्रिस्क्रिप्शन ठरतोय बाहेर निघण्याचा पास
(विनाकारण बाहेर निघण्यास परवानगी नसल्याने सकाळी 6 ते दुपारी 3 या कालावधीत लोक हातात किराणा माल व भाजीसाठी पिशवीचे घेऊन बाहेर निघत आहे. मात्र दुपारी 3 नंतर किराना व भाजीपाला बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे आता बाहेन निघणा-यांनी डॉक्टरांची चिठ्ठी (मेडिकल प्रिस्क्रिप्शन) चा आधार घेत बाहेर निघायला सुरूवात केली आहे.

भाजी घेतानाही सोशल डिस्टन्सिंगचा विसर
गांधीचौकात 15 व आंबेडकर चौकात 15 भाजीचे दुकान लावण्याची परवानगी असताना 30 ते 40 दुकाने लावलेली आढळली. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने दिसून येत आहे. याशिवाय गल्लीतही गप्पांचे फड रंगवण्यासाठी लोक एकत्र येताना दिसून येत आहे.

आज याच ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली होती.

राज्यात भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण
बारामती येथे एका भाजी विक्रेत्याला लागण झाल्याचे आजच समोर आले आहे. आधी केवळ परदेशातून येणा-या तसेच परदेशी व्यक्तींच्या संपर्कात येणा-या लोकांपासूनच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसत होते. मात्र आता त्याने कम्युनिटी संसर्गचे रुप घेतले असून आता परदेशी नागरिक व परदेशी नागरिकांच्या संपर्कात न घेणा-या लोकांनाही याचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे वणी प्रशासनानेही आता भाजी विक्रीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे त्याकडे लक्ष देऊन कठोर पावलं उचलली पाहिजे.

आज सकाळी वणीतील एका मुख्य रस्त्यावर अशी वरदळ दिसून आली.
Leave A Reply

Your email address will not be published.