कोंबड्याला दगड मारल्याने काठीने मारहाण

रंगारीपुरा येथे चार जणांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: कोंबड्याला दगड का मारला? म्हणत चौघांनी एकाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी 10 वाजता दरम्यान शहरातील शिवनेरी चौकात घडली. मारहाणीत जखमी युवकाची बहीण हिने याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

रंगारीपुरा येथील महेश लक्ष्मण पाल (30) यांनी कोंबड्याला दगड मारला म्हणून आकाश चामुलवार (24), हर्षल चामुलवार (22), सचिन चामुलवार (20) आणि अनंता चामुलवार (50) यांनी महेश सोबत वाद करून काठीने डोक्यावर आणि अंगावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेवरून महेशची बहीण आरती विजय चौधरी रा. रंगारीपुरा हिने वरील गैरअर्जदार विरुद्द तक्रार दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंविच्या कलम 324, 504, 506, 34 भादवी अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय सोमेश्वर कुमरे करीत आहे.

हे देखील वाचा:

देवीसमोर जगन्नाथ बाबांचे भजन का गात आहे म्हणत गायकाला मारहाण

चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

Comments are closed.