हिवरा मजरा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती ठावरी बिनविरोध
शेतकरी समन्वय पॅनलचे 10 तर विरोधकांचे 3 संचालक
भास्कर राऊत, मारेगाव: विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होऊन अध्यक्षपदी छत्रपती ठावरी तर उपाध्यक्षपदी बालाजी आस्कर यांची निवड करण्यात आली. अत्यंत चूरशी ठरलेल्या या निवडणुकीत शेतकरी समन्वय पॅनलचे दहा संचालक निवडून आले. तर विरोधी पॅनलचे तीन संचालक निवडून आले.
अध्यक्षपदासाठी दि. 9 जूनला झालेल्या बैठकीमध्ये काही वेगळीच घडामोड होऊ शकते. अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरु होती. त्यामुळे अध्यक्षपदाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. परंतु शेतकरी समन्वय पॅनलच्या नेत्यांनी सर्वांना एकसंघ ठेवत ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा कित्ता गिरवला गेला होता.
काँग्रेस सेना यांच्या आघाडीने पुन्हा सत्ता खेचून आणण्यात यश मिळविल्याने विरोधक नमोहरण झाले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून बाबाराव भोयर, पुरुषोत्तम बुटे, अरुण आस्कर, जीवन काळे, देविदास ताजने, प्रमोद धोबे, अमोल झिले,विनोद धोबे, रमेश ढोके, राजू आस्कर, राजू चामाटे, संतोष भोंग यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज
Comments are closed.