ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे विदेशवारी करून आलेल्या दोघांना डॉक्टरांच्या निगराणीत ‘होम कॉरेन्टाईन’ करण्यात आले आहे. यासोबतच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास खबरदारी म्हणून आरोग्य विभागाद्वारा दहा कॉरेन्टाईन बेडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सध्या मारेगावमध्ये शाळा, आठवडी बाजार, कॉलेज रेस्टारंट, सलून, पानटपरी बंद ठेऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
मारेगावात एक व्यक्ती दुबईहून तर व्यक्ती अमेरीका येथून आले होते. त्याबाबत खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने हा निर्णय़ घेतला आहे. कोरोना वायरसमुळे मारेगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला प्रशासनाच्या वतीने जास्त गर्दी करू नका, शक्यतो घरातच रहा असे आदेश देण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व गावातील पानटपरी, बार रेस्टारंट, सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून पुढील आदेश येई पर्यंत आदेशाने पालन करावे असे तहसीलदार दिपक पुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, व नगरपंचायत मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी सांगीतले
जनतेनी अफवा पासून सावध रहावे
मारेगावात दोघे परदेशवारी करून आल्याने व त्यांना होम कॉरेन्टाईन केल्याने सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याला उत आला आहे. सोशल मीडिया वरून अनेक लोक अफवा पसरत आहेत. अमुक अमुक व्यक्तीला कोरोना ची लागण झाली आहे. अशा अफवांचा यात समावेश आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांना कोणतीही लागण झाली नसून केवळ खबरदारी म्हणून त्यांना होम कॉरेन्टाईन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.